in ,

रशिया कोरोनावरील लसीचे रजिस्ट्रेशन करणार

corona vaccine
Share

रशिया 12 ऑगस्टला कोरोना व्हायरसवरील लसीचे रजिस्ट्रेशन करणार आहे. उप-आरोग्य मंत्री ओलेग ग्रिड-नेव यांनी शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली. ही लस, गामालेया रिसर्च इंस्टिट्यूट आणि रशियन संरक्षण मंत्रालयाने संयुक्तपणे तयार केली आहे.

सध्या, ही लस अखेरच्या म्हणजेच तिसऱ्या टप्प्यात आहे. या लसीच्या ​​परीक्षणास 18 जूनला सुरूवात करण्यात आली होती. यात 38 स्वयंसेवकांनी भाग घेतला होता. या संर्व स्वयंसेवकांत रोगप्रतिकारशक्ती तयार झाली. यातील पहिल्या गटाला 15 जुलैला तर दुसऱ्या गटाला 20 जुलैला सुट्टी देण्यात आली होती. यापूर्वी ही लस 10 ऑगस्ट अथवा त्यापूर्वीच बाजारात उपलब्ध होईल, असा दावा करण्यात आला होता.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

एअर इंडियाचा लोगो बदलला

महाराष्ट्राचा कोरोना रिकव्हरी रेट ६७.२६ टक्के