in ,

रशियाकडून कोरोना लसीचं रजिस्ट्रेशन

corona vaccine
Share

रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने कोरोना लसीचे रजिस्ट्रेशन केले. कोरोना आजारावर मात करण्यासाठी लसीची नोंदणी करणारा रशिया हा पहिला देश ठरला. ही लस अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या मुलीला टोचण्यात आली. यानंतर रशियात कोरोना लसीचे माणसांवर मोठ्या प्रमाणात प्रयोग सुरू झालेत.

गामालेया रिसर्च इंस्टिट्यूट आणि रशियन संरक्षण मंत्रालयाने संयुक्तपणे कोरोनावरील लस विकसित केली आहे. ही लस अखेरच्या म्हणजेच तिसऱ्या टप्प्यात आहे. या लसीच्या ​​परीक्षणास 18 जूनला सुरूवात करण्यात आली होती. यात 38 स्वयंसेवकांनी भाग घेतला होता. ज्यांना लस टोचण्यात आली त्यांच्या शरीरारत रोगप्रतिकारक क्षमता विकसित झालीय.

लस कोणाला मिळणार?

रशियाची कोरोनावर मात करणारी लस सुरुवातीला रशियातील वैद्यकीय क्षेत्रातील कोरोना योद्ध्यांना दिली जाणार आहे. नंतर ही लस रशियातील ज्येष्ठांना दिली जाईल. मोठ्या प्रमाणावर निर्मिती करुन रशियाचे सरकार ऑक्टोबरपासून कोरोनाची लस देशभरातील रुग्णांना देणार आहे. अद्याप ही लस निर्यात करण्याबाबत निर्णय झालेला नाही. रशियाचे सरकार कोरोनावरील लस सरकारी खर्चाने देणार असल्यामुळे लस टोचून घेण्यासाठी रशियातील नागरिकांना पैसे खर्च करावे लागणार नाही.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

वडिलांच्या संपत्तीत मुलाप्रमाणेच मुलीलाही समान वाटा

modi government planning to increase custom on textiles cameras laptops import licensing,

मोदी सरकार ‘या’ निर्णयाने सामन्यांचा खिशाला बसणार कात्री ?