in ,

पाच रुग्ण आढळल्यास इमारत होणार सील, मुंबई महापालिकेचा निर्णय

मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आता चिंता वाढली आहे. याच दृष्टीने मुंबई महापालिका प्रशासनाने नियमावली पुन्हा लागू केली आहे. त्यानुसार ज्या इमारतीत पाच रुग्ण आढळतील, ती इमारत सील करण्यात येणार आहे. तर, 1 मार्चपासून नगरसेवकांना लस देण्यात येणार आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली होती. दिवसाला साधारणपणे 300 ते 350 रुग्ण आढळत होते. मात्र आता पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. 14 फेब्रुवारीला 645, 15 फेब्रुवारीला 493, 16 फेब्रुवारीला 461, 17 फेब्रुवारीला 721, 18 फेब्रुवारीला 736 तर आज (19 फेब्रुवारी) मुंबईत 823 नव्या रुग्णांचे निदान झाले. म्हणूनच पालिकेने आता कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतल आहे.

रुग्णसंख्या वाढली तर राज्य सरकारच्या नियमानुसार लोकडाऊनला सामोरं जावे लागेल, असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

असे असतील नवे नियम –

 • लग्न, बारसे, इतर सोहळ्यांमध्ये 50पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास मनाई
 • उपस्थितांनी कोरोनाविषयक सर्व नियम पाळणे बंधनकारक
 • रेल्वेत 300 ते 1000 मार्शल ठेवणार लक्ष, त्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू
 • 5 रुग्ण आढल्यास इमारत सील करणार
 • हातावर होमक्वारंटाइनचे शिक्के देणार
 • उपहारगृहात एका मेजावर दोन जण बसतील, पण नियम पाळणे बंधनकार
 • 24 प्रभागांत वॊर रूम, शिक्षकांकडे त्याची जबाबदारी
 • प्रार्थनास्थळांवर शिक्षकांमार्फत देखरेख
 • जास्तीत जास्त चाचण्या करून हायरिस्क कॉन्टॅक्ट ट्रेस करणार
 • फिरत्या व्हॅनचा वापर करून रुग्णांचा शोध
 • ब्राझीलमधून येणाऱ्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवणार
 • हॉटेलमधून न जाता थेट पळून जाणाऱ्यावर कारवाई होणार

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

चिंताजनक ! आज कोरोना रुग्णांनी ओलांडला ६ हजाराचा टप्पा

सुप्रिया सुळेंनी शरद पवारांच्या ‘त्या’ पावसातल्या सभेचा सांगितला किस्सा…