in

पेट्रोल-डिझेलच्या दर वाढीवर रोहित पवारांची सरकारवर टीका

लोकशाही न्यूज नेटवर्क

पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत, यासंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फेसबुक लिहिली आहे. रोहित पवार यांनी केंद्र सरकार चलाखी करत असल्याचा आरोप करताना राज्यातील भाजपा नेत्यांना ‘जनाची नाही, तरी मनाची ठेवावी’असा टोला लगावला आहे. या पोस्टसोबत रोहित पवारांनी २०१४च्या लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या जाहिरातीचाही फोटो शेअर केला आहे.

या पोस्टमध्ये रोहित पवारांनी “पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आज गगनाला भिडल्यात. परिणामी आधीच उत्पन्न घातलेल्या नागरिकांना या वाढलेल्या किमतीची झळही सहन करावी लागतेय. पुण्यात पेट्रोलचा दर ९३ रु प्रती लिटर आहे. वास्तविक सगळ्याच कंपन्यांची पेट्रोलची बेसिक किंमत २९.३४ रु प्रती लिटरच्या घरात असून, त्यात वाहतूक खर्च धरला तर डिलरला पेट्रोल ३० रु प्रति लिटरपर्यंत पडतं. केंद्राचा एकूण कर ३२.९८ रु, डिलरचं कमिशन ३.६९ रु, तर राज्याचा कर २६ ते २७ रुपयाच्या दरम्यान आहे. केंद्राचे कर बघितले तर त्यात बेसिक एक्साइज ड्युटी १.४० रु, स्पेशल अॅडिशनल एक्साइज ड्युटी ११ रु, कृषि सेस २.५ रु, रस्ते आणि पायाभूत सुविधा सेस १८ रु असे एकूण ३२.९० रु एका लिटरमागे केंद्र सरकार वसूल करतं. या ३२.९० रु करापैकी केवळ बेसिक एक्साइज ड्युटीमध्येच राज्यांना वाटा मिळतो. सेस आणि स्पेशल अॅडिशनल एक्साइज ड्युटीमध्ये राज्यांना वाटा मिळत नाही,”

पेट्रोल-डिझेलवरील करांच्या माध्यमातून राज्यांना वाटा द्यावा लागू नये आणि आपलेच खिसे भरताना जनतेचे खिसे कसे कापतो हे कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून केंद्र सरकारने ही चाल खेळली. अशा प्रकारे राज्यांचा खिसा कापल्यामुळं केंद्रीय करातील वाट्यापोटी राज्यांना मिळणारी रक्कम घटणार असून, महाराष्ट्राला २०२१-२२ या आर्थिक वर्षात केवळ ४२०४३ कोटी रुपये मिळणार आहेत,” असं यांनी म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस आक्रमक

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, 150 जण बेपत्ता, 10 मृतदेह हाती, बचावकार्य सुरु