in ,

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी रोबोची मदत

Share

पुणे: कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये. वाढत्या रुग्णसंख्येनं विविध यंत्रणा कार्यान्वित कराव्या लागतायेत. हॉस्पिटलमधील रुग्णांच्या संपर्कामुळे डॉक्टर, नर्स किंवा इतर सेवा देणाऱ्या व्यक्तींना संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. हाच धोका टाळण्यासाठी पुण्यातील कँन्टोनमेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलमध्ये रोबोट कार्यान्वित करण्यात आले आहे.

हे रोबोटचं आता रुग्णांना जागच्या जागी अन्न, नाष्टा, पाण्याची पोहोच करतायेत. पुण्यातील कँन्टोनमेंटच्या परिसरातील आयटीआयच्या मुलांनी या रोबोची निर्मीती केली आहे. साधारण पन्नास हजाराच्या जवळपास या रोबोला निर्मितीसाठी खर्च आला आहे. बँटरीवर चालणारा हा रोबो रुग्णालयात रुग्णांची सेवा करतोय. रुग्णांपासून वाढता धोका लक्षात घेता बनवलेला हा रोबो नक्कीच हितदायी ठरणार आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

कोरोनाचं मृत्यू तांडव! आतापर्यंत २,२८,३९४ जणांनी गमावला जीव

CoronaVirus | पुण्यात चिमुरड्यांसाठी ऑनलाईन क्लासेस