in

आरोपातून वाचण्यासाठी रियाने मागितली सर्वात महागड्या वकिलाची मदत, दिवसाला घेतात इतके लाख रुपये

Riya seeks help from most expensive lawyer to escape charges
Riya seeks help from most expensive lawyer to escape charges
Share

सतीश माने-शिंदे हे असं नाव, ज्या नावाने अनेक बॉलिवूडकर्मीयांना कोर्टात किंवा तुरुंगात जाण्यापासून वाचवलं आहे. संजय दत्त आणि सलमान खान अशा दिग्गजांचं प्रतिनिधित्व न्यायालयात करणाऱ्या वकिलांपैकी एक म्हणजे सतीश माने-शिंदे. हे नाव आता पुन्हा चर्चेचा विषय बनलं आहे, कारण ज्या सुशांतसिंह राजपुतने आत्महत्या केली, त्याच सुशांतसिंह राजपुतच्या गर्लफ्रेंडची बाजू कोर्टात मांडण्यासाठी ही व्यक्ती आता समोर आली आहे.

सुशांतने आत्महत्या करण्यास त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती जबाबदार असल्याचं सुशांतच्या वडिलांनी म्हणजेच केके सिंह यांनी म्हटलय. फक्त म्हणून ते शांत बसले नाहीत, तर तशी रितसर तक्रारही पाटण्यातील राजेंद्र नगर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यावर फसवणूक, आत्महत्येस प्रवृत्त करणे, चुकीच्या गोष्टींना चालना देणे आणि ब्लॅकमेल करणे, असे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.

सुशांतसिंग राजपूत यांच्या वडिलांनी आरोप केला आहे की, बॉलिवूडच्या अनेकांनी त्याला टीममधून बाजूला ढकलं होतं. तसेच आम्हाला माहित नसतानाही त्याला मानसिक आजारावर उपचार घेण्याचा सल्लाही त्याला दिला होता. अशी अनेक कारणे आता हळू हळू समोर आली आहेत. त्यामुळे या सगळ्यात सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी रिया चक्रवर्तीने सतीश माने-शिंदे यांची निवड केली आहे.

कोण आहेत सतीश माने-शिंदे
संजय दत्तच्या अटकेनंतर त्याला बेल मिळवून देणे, तसेच संजय दत्तची बाजू सर्वोच्च न्यायलयात मांडण्याचं काम सतीश यांनी केलं आहे. नशेत असलेल्या ड्रायव्हिंग प्रकरणात सलमान खानला जामीन मिळवून देणारे हेच ते सतीश मनेशेंडे.

हे ते वकील आहेत, ज्यांची एका दिवसाला 10 लाख रुपये फी आहे. सतीश माने-शिंदे हे सर्वोच्च वकिलांपैकी एक आहेत आणि नुकत्याच झालेल्या पालघर लिंचिंग प्रकरणात ते प्रतिनिधित्व करीत होते. याच विकीलांची सहकारी आनंदिनी फर्नांडिस या रिया चक्रवर्ती यांच्या निवासस्थानी दिसली होती. तब्बल तीन तास रिया आणि आनंदी यांच्यात मिटिंग झाली होती. रिया चक्रवर्तीला तात्काळ अटक करावी, अशी सुशांतसिंग राजपूतच्या कुटुंबीयांनी मागणी केली आहे, त्यामुळे कधीही रियावर कारवाई होऊ शकते, तसं होऊ नये म्हणूनच रियाने हा पर्याय निवडला आहे.

बिहारचे राजकीय नेते या प्रकरणाला पाठिंबा देत आहेत. पश्चिम बंगालमधील रूपा गांगुली यांनीही या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. क्रिकेटर मनोज तिवारी, मीरा चोपडा, अक्षय खन्ना, शेखर सुमन आदी सेलेब्रिटींची निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली आहे. हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात यावं, अशी मागणी खुद्द रिया चक्रवर्तीने केली आहे. मात्र आज संध्याकाळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडेच असेल, असं ठाम मत मांडलं आहे. बैठक बोलावली आहे. आम्हाला आशा आहे की न्याय कायम आहे!

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

‘खुलता कळी खुलेना’ मालिका फेम मयुरीच्या पतीने केली गळफास लावून आत्महत्या

70 च्या दशकातील बॉलीवूडच्या ‘मदर इंडिया’ सुलोचनादीदींचा आज वाढदिवस…