in ,

उत्तराखंड : ऋषभ पंत चेन्नई टेस्टचं मानधन देणार हिमस्खलनातील पीडितांना

लोकशाही न्यूज नेटवर्क

उत्तराखंडमध्ये 7 फेब्रुवारी रोजी झालेल्या हिमस्खलन दुर्घटनेतील पीडितांसाठी क्रिकेटपटू ऋषभ पंतने चेन्नई टेस्टचं मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. ऋषभ हा उत्तराखंडमधल्या रुरकीचा आहे.

“उत्तराखंडमधील दुर्घटनेने अतिशय दु:खी झालो आहे. या अपघातात जीव गमावलेल्यांना मी श्रद्धांजली वाहून. या दुर्घटनेतील पीडितांकरता चेन्नई टेस्टचं मानधन देण्याचा निर्णय मी घेतला आहे.

यानंतर ऋषभने लोकांनाही मदतीचे आवाहन केले आहे. यामध्ये अपघातात जखमी झालेल्यांना यातून सावरण्यासाठी बळ मिळावं. मदतकार्याद्वारे अडकलेल्यांची सुटका व्हावी यासाठी प्रार्थना करा असे म्हटले आहे .

ऋषभ पंतने सिडनी टेस्टमध्ये 97 रन्स करताना ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगवर जे आक्रमण केलं ते विलक्षण होतं. ब्रिस्बेन टेस्टच्या पाचव्या दिवशी तीनशेपेक्षा जास्त रन्सचं लक्ष्य समोर असतानाही ऋषभने नाबाद 89 रन्सची खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं होतं. ऋषभला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

उपचाराची फी मागितल्याने डॉक्टरचे बोट छाटले

आजी-माजी गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात गुन्हेगारी कायम टिपेलाच!