in

पालघरवासियांना दिलासा; जिल्ह्यातील निर्बंध आणखी शिथिल होणार

पालघरमध्ये जिल्ह्यात ब्रेक द चेन काळात लादलेल्या निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे आता येत्या 14 जूनपासून आणखी निर्बंध शिथिल होणार आहेत. नेमकी काय असेल नियमावली पाहूयात.
पालघरमध्ये 14 जूनपासून निर्बंधांमध्ये शिथिलताचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकानंही आता दिवसभरासाठी राहतील खुली.

पालघर जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर ४.४३ टक्के झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याने लेवल 2 मध्ये समावेश झाल्याने काही निर्बंधात शिथिलता जिल्हाधिकारी डॉक्टर माणिक गुरसळे यांनी आदेश दिले आहेत. मात्र जमावबंदी आणि संचारबंदी लागू असणार आहेत.

नवीन नियमावली

  • अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकानंही आता दिवसभरासाठी खुली
  • मॉल्स सिनेमागृह, नाट्यगृह, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरू
  • विवाह समारंभासाठी हॉलच्या 50 टक्के क्षमतेने तर जास्तीत जास्त 100 व्यक्तींना परवानगी.
  • सार्वजनिक वाहतूक 100 टक्के क्षमतेने सुरू

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Lokshahi Impact; लोकशाहीच्या बातमीनंतर हुल्लडबाजांवर गुन्हा दाखल

वाशिममध्ये 35 खेडयाचा विद्युत पुरवठा खंडित;ग्रामस्थांनी महामार्गावर केला चक्काजाम