in

पुढील प्रजासत्ताक दिनाची परेड राजपथावर नव्हे तर, ‘येथे’ होणार…

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारतीय प्रजासत्ताक दिनाचे (26 जानेवारी) प्रमुख आकर्षण असते ते राजपथावर होणारे संचलन. या संचलनाद्वारे भारतीय लष्करी ताकद सर्वांना दिसते. तसेच संस्कृतीतील विविधतेचे दर्शनही या संचलनातूनच होते. पण पुढील वर्षापासून संचलनाचे हे स्थळ बदलण्यात येणार आहे. खुद्द केंद्र सरकारनेच ही माहिती दिली.

सन 1955पासून प्रजासत्ताक दिन राजपथावर साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. तेव्हापासून प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम राजपथावर मोठ्या उत्साहात होतो. यानिमित्त रायसीना हिल्स येथून संचलनाला (परेड) सुरुवात होते आणि राजपथ, इंडिया गेट मार्गे लाल किल्ल्यावर ते संपते. मात्र, पुढील वर्षीपासून सेंट्रल व्हिस्टा येथे हे संचलन होईल. हे आधुनिक भारताचे प्रतिक असेल. आपण घेतलेली अभूतपूर्व भरारी सर्व पाहू शकतील, असे केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सांगितले.

यावरून त्यांनी काँग्रेससह विरोधकांवरही टीका केली आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे महत्त्व काय आहे, याची कल्पना नाही. आपल्या देशाने प्रगती करावी, असे काहींना वाटत नाही. त्यांनी तर, कोरोना प्रतिबंधक लसीबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, अशी टीका हरदीपसिंग पुरी यांनी केली आहे.

काय आहे सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प?
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प हा मोदी सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यामध्ये नव्याने संसद भवनाच्या उभारणीसह सामायिक सचिवालय देखील उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाची घोषणा सप्टेंबर 2019मध्ये करण्यात आली होती. नव्या संसद भवनातील आसनव्यवस्था 900 ते 1200 खासदारांची असून ते त्रिकोणी आकाराचे असेल. ऑगस्ट 2022मध्ये भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव असून तोपर्यंत हे संसद भवन उभारण्याचे नियोजन आहे. तर, 2024पर्यंत सामायिक सचिवालय उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आल्या होत्या. पण न्यायालयाने काही अटींसह या प्रकल्पाला मंजुरी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अमेरिकेने केले नव्या कृषी कायदयांचे समर्थन अनं कंगनाचा थयथयाट

India vs England | भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये शुक्रवारपासून कसोटी मालिकेला सुरुवात