बिहारमध्ये निवडणूकीच्या निकालानंतर सरकार स्थापनेच्या हालचालीला वेग आला आहे. एकीकडे एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर भाजपकडून सत्ता स्थापनेचा दावा होत असताना , बिहारच्या निवडणूक निकालातला सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या आरजेडीच्या तेजस्वी यादव यांनी सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामूळे महाराष्ट्र प्रमाणे आता बिहारमध्ये सुद्धा भाजपची सत्ता जातेय कि काय ? आणि महागठबंधनची सरकार स्थापन होतेय का ? असा तर्कवितर्क राजकीय विश्लेशकांकडून लावला जात आहे.
बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर सरकार स्थापन करण्यास वेग आला आहे. तसेच नितीश कुमारच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असं भाजपाकडून बुधवारी स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे आता नितीश कुमार मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
या सर्व घडामोडीत राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी सुद्धा सरकार स्थापण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये महागठबंधन सरकार स्थापन करणार असल्याचं म्हटलं आहे. यावेळी आरजेडीच्या सर्व आमदारांना आपल्या मतदारसंघात न परतता पुढील एक महिना पाटण्यातच थांबण्याचा आदेश दिला आहे.
तसेच तेजस्वी यादव यांनी एनडीएमधील दोन घटक पक्षांच्या संपर्कात आहे. यातील एक आहे मुकेश सहानी यांची विकासशील इनसान पार्टी आणि दुसरी आहे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांची हिंदुस्तानी आवाम मोर्चा पार्टी. मांझी आणि सहानी या दोघांच्याही पक्षाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतू आमच्यासाठी सर्व मार्ग खुले असल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय जनता दलाने या मुकेश सहानी यांना तर उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली असल्याची माहिती आहे. त्यामुळे हि समीकरण जुळल्यास मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे.
दरम्यान आता तेजस्वी यादव बिहारमध्ये भाजपला सत्तेपासून दूर लोटत ‘महाराष्ट्र पॅटर्न’ ची पुनरावृत्ती करते का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदी विराजमान होतात का ? हे पहावे लागणार आहे.
Comments
0 comments