in

वसई-विरारकरांना दिलासा; मोबाइल व्हॅन लसीकरणाने घेतली गती

संदीप गायकवाड | वसई-विरार महापालिका क्षेत्रात लसीकरण केंद्रासोबतच मोबाइल व्हॅनद्वारे लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या नवीन मोहिमेमुळे शहरात लसीकरणाला मोठी गती मिळाली आहे. तसेच नागरिकांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे.

लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी, लसीकरणासाठीची लांबच लांब रांगा यामुळे वयोवृद्ध नागरिक, अपंग नागरिक, व इतर व्याधी असलेल्या नागरिकांचे मोठे हाल होत होते. कधी कधी रांगा लावूनही नागरिकांना लस मिळत नव्हती. अशा नागरिकांचे लसीकरण सुलभतेने व्हावे यासाठी पालिकेने व आमदार हितेंद्र ठाकूर,आमदार क्षितिज ठाकूर यांनी पुढाकार घेऊन मोबाईल व्हॅनद्वारे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.विशेष करून जे नागरिक लसीकरण केंद्रापर्यंत पोहचू शकत नाही अशा नागरिकांसाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान आज विरार पूर्व तारवाडी परिसरात आज 100 नागरिकांना लस देण्यात आली आहे.यावेळी बहुजन विकास आघाडीचे संघटन सचिव,अजीव पाटील माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत,माजी नगरसेविका चिरायु चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Monsoon 2021 | महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

Sushant Singh Rajput Case| सिद्धार्थ पिठानीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी