राज्यात शुक्रवारपासून सलग तीन दिवस सहा हजार ते सात हजारच्या दरम्यान नवे रुग्ण आढळत होते. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत आज (सोमवार, 22 फेब्रुवारी) रुग्णसंख्या सव्वापास हजारावर आली आहे. विशेष म्हणजे, एवढ्याच रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात रविवारी कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या 6 हजार 971वर पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. अन्यथा लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवू शकते, असा इशाराही दिला होता. या पार्श्वभूमीवर विदर्भासह राज्याच्या काही भागांत निर्बंध लागू करण्यात करण्यात आले आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम आज पाहायला मिळाला.
दिवसभरात करोनाचे 5 हजार 210 नवीन रुग्ण आढळले. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 57 लाख 93 हजार 424 नमुन्यांपैकी 21 लाख 6 हजार 94 नमुने म्हणजेच 13.34 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 24 हजार 54 व्यक्ती होमक्वारंटाइन असून 53 हजार 113 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 51 हजार 806 वर पोहोचला आहे. राज्यातील मृत्यू दर 2.46 टक्के आहे.
राज्यात आज 5 हजार 35 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण 19 लाख 99 हजार 982 रुग्ण करोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. त्यानुसार रुग्ण बरे होण्याचा दर 94.96 टक्के झाला आहे.
Comments
Loading…