अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या बँक खात्यातून रियाने अनेकदा मोठी रक्कम काढल्याचे उघड झाले आहे. रियाने पूजा करण्याचे निमित्त करुन सुशांतच्या खात्यांतून अनेकदा मोठी रक्कम काढली होती. रियाच्या कुटुंबातील सदस्यांनीही सुशांतच्या खात्यांमधून मोठ्या रकमा काढल्या आहेत. यातील किती रक्कम पूजेसाठी खर्च झाली आणि किती रक्कम खासगी वापरासाठी खर्च झाली हा प्रश्नच आहे.
१४ जुलै २०१९: ४५,००० रुपये
२२ जुलै २०१९: ५५,००० आणि ३६,००० रुपये
२ ऑगस्ट २०१९: ८६,००० रुपये
८ ऑगस्ट २०१९: ११,००० रुपये
१५ ऑगस्ट २०१९: ६०,००० रुपये
सुशांत प्रकरणी रिया चक्रवर्तीची चौकशी होणार
सुशांत प्रकरणी बिहार पोलीस रिया चक्रवर्ती, तिचे आईवडील आणि सख्खा भाऊ तसेच दिग्दर्शक रुमी जाफरी आणि दिग्दर्शक मुकेश छाबडा यांच्यासह अन्य काही जणांची लवकरच चौकशी करणार आहेत.
सीबीआय चौकशीची आवश्यकता
सुशांत प्रकरणी सीबीआय चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केंद्रीय मंत्री आर के सिंह यांनी केली आहे. सीबीआयद्वारे सखोल चौकशी करावी अशी मागणी अनेक नागरिक करत असल्याचे ते म्हणाले.
मुंबई पोलिसांचे महत्त्वाचे वैद्यकीय दाखवले नाही – डीजीपी, बिहार पोलीस
मुंबई पोलिसांनी अद्याप सुशांत प्रकरणाशी संबंधित महत्त्वाचे वैद्यकीय अहवाल दाखवलेले नाही. पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आणि इतर फॉरेन्सिकचे अहवाल आमच्या अधिकाऱ्यांना अद्याप मिळालेले नाही, असे बिहारचे डीजीपी म्हणाले.
Comments
0 comments