in

फडणवीसांच्या काळातील भरती राज्यपालांनी रोखली

सार्वजनिक आरोग्य विभागातील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि विशेषज्ञ या दर्जाची एकूण २७० पदांची भरती प्रक्रिया राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेतून तीन वर्षांसाठी वगळून ही पदे थेट निवड मंडळामार्फत भरण्यास मंजुरी देण्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नकार दिला आहे. मागील फडणवीस सरकारच्या काळात याबाबत मंत्रिमंडळ निर्णय होऊन आणि भरती प्रक्रियाही सुरू होऊन आता पावणेदोन वर्षे उलटल्यानंतर त्या निर्णयाबाबत पेच निर्माण झाला आहे.

ही पदे लोकसेवा आयोगाच्या कक्षेतून वगळून निवड मंडळामार्फत भरण्याबाबत फडणवीस सरकारने पावले उचलली. त्यानुसार या निर्णयाशी संबंधित विविध विभागांचे अभिप्राय मागवले असता, लोकसेवा आयोगानेही या प्रस्तावास विरोध केला. तसेच या पदांच्या भरतीमध्ये होणाऱ्या विलंबास लोकसेवा आयोग जबाबदारी नाही व त्यामुळे ही पदे आयोगाच्या कक्षेतून वगळण्यात येऊ नये, असा स्पष्ट अभिप्राय सामान्य प्रशासन विभागाने दिला. तरी फडणवीस सरकारने ती तीन वर्षांसाठी वगळण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सकांची १२३ पदे, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची ३० पदे भरण्यासाठी ४ सप्टेंबर २०१९ रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आली. त्यानंतर २५ जानेवारी २०२० रोजी विशेषज्ञांची ११७ पदे भरण्याची जाहिरात प्रकाशित झाली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईसह कोकणाला अतिवृष्टीचा इशारा

पाणी देण्यास नकार देत दलित कुटुंबांला मारहाण