in

देशात 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक रुग्ण वाढ; पाहा आकडेवारी

Share

भारतात कोरोना व्हायरसने हाहाकार माजविला असून मागील 24 तासांत रुग्णसंख्येत 50 लाखांच्या वर वाढ झाली आहे. भारत केंद्र सरकार आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, (30 जुलै) मागील 24 तासांत 52,123 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले असून 775 रुग्ण दगावल्याची माहिती दिली आहे. यामुळे देशात एकूण कोरोना बाधितांची संख्या 15,83,792 वर पोहोचली असून 34,968 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्य घडीला देशात 5,28,242 रुग्णांवर उपचार सुरु आहे. यामध्ये एक दिलासादायक बाब म्हणजे देशात बरे झालेल्या रुग्ण संख्येत 10 लाखांच्या वर वाढ झाली असून एकूण 10,20,582 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

भारतात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात असून राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची संख्या 4,00,651 इतकी झाली आहे. यात उपचार घेऊन बरे झालेल्या 2,39,755 जणांचा, प्रत्यक्ष रुग्णालायत उपचार सुरु असलेल्या 1,46,129 रुग्णांचा आणि आजवर कोरोनामुळ मृत्यू झालेलया 14,463 रुग्णसंख्येचाही समावेश आहे.

महाराष्ट्रापाठोपाठ तमिळनाडू, नवी दिल्ली, गुजरातमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. गृह मंत्रालया (MHA) ने अनलॉक 3 (Unlock 3) मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहे, त्याद्वारे रात्रीच्या वेळी व्यक्तींच्या हालचालीवरील निर्बंध हटविले गेले आहेत. तसेच योग संस्था (Yoga Institutes) आणि व्यायामशाळा (Gymnasiums) 5 ऑगस्ट 2020 पासून उघडण्यास परवानगी दिली आहे. अनलॉक 3 मार्गदर्शक तत्त्वे 1 ऑगस्ट पासून लागू होतील. केंद्र सरकारने यावेळी अनलॉक 3 मध्ये कंटेनमेंट झोनच्या बाहेर आणखी काही गोष्टी सुरू करण्यासाठी पावले उचलली आहेत.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Raksha Bandhan 2020 ; अनेक वर्षानंतर येतोय ‘सर्वार्थ-सिद्धी’सह दीर्घायु आयुष्मान ‘योग’, जाणून घ्या शुभ मुहूर्त

‘मजूर’ आई-वडिलांच्या कष्टाचे ‘मोल’;विद्यार्थिनीने पटकावले 94.40 टक्के