महाराष्ट्र ATSच्या पत्रकार परिषदेनंतर केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी तातडीने एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली. तसेच, शरद पवारांनी या प्रकरणात गृहमंत्र्यांना पाठिंबा देऊन आपली प्रतिष्ठा गमावली आहे. त्याच प्रमाणे शरद पवार अनिल देशमुखांना पवार पाठीशी का घालत आहेत ? असा सवाल करत रवीशंकर प्रसाद यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.
यावेळी गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा एकच पर्याय समोर आहे, असे रवीशंकर म्हणाले. आज सकाळी देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातील पोलिसांच्या बदल्यांसाठी चाललेल्या भ्रष्टाचाराबाबतची काही कागदपत्रे समोर आणली. डॉ. रश्मी शुक्ला यांनी तत्कालीन डीजीपी सुबोध जैसवाल यांना याबाबत माहिती दिली होती. तसेच, हे मुख्यमंत्र्यांना सांगून यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. याबाबत मुख्यमंत्र्यांनी दोषींवर कारवाई करण्याऐवजी, रश्मी शुक्लाचीच बदली केली. त्यानंतर सुबोध जैसवाल आणि रश्मी शुक्ला या दोघांनीही महाराष्ट्र सोडला.
अनिल देशमुखांना पवार पाठीशी का घालत आहेत ? यामध्ये शरद पवारांची काय मजबुरी असेल याचा शोध घेणे गरजेचे आहे. ज्या प्रमाणे अनिल देशमुखांच्या बाबतीत शरद पवार दावा करत आहेत. त्याप्रमाणे जर घडले असेल तर अनिल देशमुखांनी कोरोनाचे नियम मोडले आहेत. कोरोना रुग्ण असताना देखील त्यांनी विमानातून प्रवास केला. असे देखील त्यांनी यावेळी निदर्शनात आणून दिले.
महाराष्ट्रातील सरकार हे महाविकास आघाडी नव्हे महावसुली आघाडीचे सरकार आहे. अगोदर एका पोलीस अधिकारी सचिन वाझे संशयाच्या फेरीत अडकला. यानंतर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या माजी पोलीस आयुक्ताने गृहमंत्र्यांवर १०० कोटी रुपये प्रति महिना वसूलीचे ‘टार्गेट’ दिल्याचा केला. जर एका मंत्र्याचे टार्गेट १०० कोटींचे असेल, तर सर्व मंत्र्यांचे मिळून किती असेल? शिवाय केवळ मुंबईचे लक्ष्य १०० कोटी असेल, तर बाकी महाराष्ट्राचा किती असेल? ही वसूली गृहमंत्री स्वतःसाठी करत होते, पक्षासाठी करत होते, की सरकारसाठी करत होते या प्रश्नांची उत्तरे अजून समोर आली नाहीत.
Comments
Loading…