in

रत्नागिरीमध्ये चिपळूण शहराजवळच्या खेर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये आग

चिपळूण शहराजीकच्या खेर्डी औद्योगिक वसाहतीमधील थ्री एम पेपरमधील वेस्टेज मटेरियलला रविवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीच्या धुराचे लोट इतके मोठे होते की ते परिसरातील नागरिकांना पाहता येत होते. या आगीची घटना समजताच अग्निशमन बंबाच्या सहाय्याने ही आग विझविण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, तासाहून अधिक काळ लोटला तरी आग आटोक्यात आली नव्हती. मात्र, तोपर्यंत कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून लोटे औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. सुरुवातीला सुप्रिया केमिकल्स, नंतर घरडा तर रविवारी समर्थ केमिकल्स कंपनीत आग लागण्याची घटना घडली. समर्थ कंपनीतील आग विझतो न विझतो खेर्डी औद्योगिक वसाहतीमधील थ्री एम पेपर मिलमधील वेस्टेज मटेरियलला अचानक आग लागली. ही घटना उघडकीस येताच चिपळूण नगर परिषद व खेर्डी औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन बंबानी घटनास्थळी धाव घेत ही आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, तासाहून अधिक काळ लोटला तरी ही आग विझली नव्हती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

टाटांनी करून दाखवलं , २०० ते ३०० टन ऑक्सिजनचा पुरवठा करणार

उद्धव ठाकरेंच्या पाठोपाठ आता केजरीवालांचे पंतप्रधानांना पत्र