पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वाढत्या दबावानंतर शिवसेनेचे संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सपत्नीक भेट घेऊन कॅबिनेट बैठकीपूर्वीच संजय राठोड यांनी राजीनामा दिला. तर दुसरीकडे मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव चर्चेत आले आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सचिन वाझे यांना अटक करण्याची मागणी केली. परिणामी शिवसेनेचे संजय राठोड यांच्या पाठोपाठ आता सचिन वाझे यांच्या नावाच्या चर्चेमुळे शिवसेना दोनदा अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे.
संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर आता त्यांच्या मंत्रिपदाचा तात्पुरता कारभार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठरवतील त्याच मंत्र्याकडे जाईल. मंत्रिमंडळ विस्तारात वनमंत्री म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्याचं नाव निश्चित करतील, त्यालाच वनमंत्री पदाची लॉटरी लागेल. तर मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी केली आहे. सगळे पुरावे असताना सचिन वाझे यांना अटक का होत नाही असा सवाल विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी केला.
या सगळ्या प्रकरणात महत्वाची अशी स्कॉर्पिओ गाडीही सचिन वाझे यांच्याकडे चार महिने होती असा खळबळजनक खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी आज मंगळवारी सभागृहात केला. इतके सगळे पुरावे असताना सचिन वाझे यांना अटक का होत नाही असाही सवाल फडणवीस यांनी केला. तर सत्ताधारी पक्षानेही भाजपचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येत नावे असणाऱ्यांना अटक होणार का असा सवाल केला. यामुळे निर्माण झालेल्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब झाले.
Comments
Loading…