in

Rashmika Mandanna | रश्‍मिका मंदानाचा ‘मोस्ट डिजायरेबल वुमन’च्या यादीमध्ये प्रवेश

‘नॅशनल क्रश’ बनल्यानंतर रश्‍मिका मंदानाने मोस्ट डिजायरेबल वुमनच किताब दुसऱ्यांदा पटकावला आहे. तिची क्रेझ इतकी वाढत चालली आहे की लवकरच ती इंटरनॅशनल क्रश बनेल, असा विश्‍वास वाटायला लागला आहे.

दक्षिणेची सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्‍मिका मंदानाने 2016 च्या ‘किरीक पार्टी’ या कन्नड चित्रपटाद्वारे अभिनयात पदार्पण केलेल्या पहिल्याच सिनेमातून तिने प्रेक्षकांना वेड लावले होते. ‘कार्ती’ सोबतचा ‘सुल्तान’ हा तिचा पहिला तमिळ चित्रपट याच वर्षी प्रदर्शित झाला.

बॉलीवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ती ‘गुडबाय’मध्येही दिसणार आहे. तर अल्लू अर्जुनबरोबर ‘पुष्पा’मध्येही ती असेल. ‘पुष्पा’चा पहिला भाग यावर्षी ऑगस्टमध्ये तर दुसरा भाग पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

COVID 19 | अखेर परदेशी लसींचा देशात वापर करण्यास मंजुरी

विना डिग्री कोणी डॉक्टर बनत असेल तर कारवाई करा