लोकशाही न्यूज नेटवर्क
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय (राणीची बाग) आज सकाळपासून खुली झाल्याची माहिती उद्यान अधीक्षक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली. उद्यान नागरिकांसाठी जरी खुले करण्यात आले असले तरी प्राणिसंग्रहालयात येणाऱ्या नागरिकांना वावरताना कोरोना विषयक नियमांचे पालन करणे बंधनकारक केले आहे. त्याचा प्रमाणे ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया आणि पाच वर्षांखालील मुलांना बागेत न येण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया आणि ५ वर्षांखालील लहान मुलांनी शक्यतो प्राणिसंग्रहालयास भेट देणे टाळावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. मास्कचा वापर अनिवार्य, प्रवेशद्वाराजवळ वाहनांची चाके निर्जंतुकीकरण फवारणी करूनच प्राणिसंग्रहालयात प्रवेश करावा. समूहाने फिरू नये. यासारख्या सूचना जरी करण्यात आली आहेत. प्रदर्शनीय क्षेत्रात काचेला अथवा बॅरिकेडला स्पर्श करू नये अशा सूचना पर्यटकांना देण्यात आल्या आहेत.
नियम :
- ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया आणि ५ वर्षांखालील लहान मुलांनी शक्यतो प्राणिसंग्रहालयास भेट देणे टाळावे.
- मास्कचा वापर अनिवार्य.
- प्रवेशद्वाराजवळ वाहनांची चाके निर्जंतुकीकरण फवारणी करूनच प्राणिसंग्रहालयात प्रवेश.
- समूहाने फिरू नये.
- मुखपट्टी व हातमोजे इतरत्र न फेकता जागोजागी ठेवण्यात आलेल्या विशिष्ट कचऱ्याच्या डब्यात टाकावे.
- साहित्य जमा करून ठेवण्याची सुविधा तात्पुरती बंद असल्याने सोबत कमीत कमी वस्तू आणाव्यात. खाद्यपदार्थ, प्लास्टिकच्या बाटल्या आणू नयेत.
- तिकीट खिडकीजवळ आखून दिलेल्या जागेवरच रांगेत उभे राहावे,गर्दी करू नये.
Comments
Loading…