in ,

मुख्यमंत्र्यांनी सांगितले, ‘बाळासाहेबांचा शिवसैनिक कसा?’ अन् राणे पिता-पुत्र खवळले…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (6 मार्च) कोकणातील लघू पाटबंधारे योजनांचे भूमीपूजन केले. त्यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक कसा असतो, हे सांगत भाजपा खासदार नारायण राणे यांना टोला लगावला. यावरून नारायण राणे यांच्यासह त्यांचे पुत्र निलेश राणे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.

आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री असला तरी, तुम्ही लोक जी काही मागणी करत आहात, ती स्वतःसाठी करत नाही. मला स्वतःचं वैद्यकीय महाविद्यालय पाहिजे, रुग्णालय पाहिजे, तसं नाही. तुम्ही वैद्यकीय महाविद्यालयं मागितलेले आहे, ते देखील सरकारी मागितलेले आहेत. नाहीतर स्वतःसाठी मागू शकत होता. म्हणून मला तुमचा अभिमान आहे. बाळासाहेबांचे शिवसैनिक हे असेच असायला हवेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना लगावला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील पडवे-कसाल येथे नारायण राणे यांनी सर्व सुविधांनी सज्ज असे खासगी लाइफ टाइम मेडिकल कॉलेज उभारले. या कॉलेजचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अलीकडेच करण्यात आले. यावरूनच मुख्यमंत्री ठाकरे यांनी राणेंना टोला लगावला.

बालावाडी चालू करून दाखवावी…
मुख्यमंत्र्यांच्या या उल्लेखाने नारायण राणे खवळले असून त्यांनी याबाबतची नाराजी व्यक्त केली. ‘मी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज हे स्वखर्चातून जनतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काढलेले आहे, सरकारी पैशातून नाही. श्रीयुत उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करून दाखवावी,’ अशी तीव्र प्रतिक्रिया दिली.

वर्गणी आणि टक्केवारी
भाजपा नेते निलेश राणे यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘हा फक्त टोमणे मारणारा मुख्यमंत्री आहे, त्या पदाला शोभणारा माणूस नाही. ठाकरेंनी स्वतःचे पैसे लावून एक संस्था उभी केलेली दाखवावी. ठाकरे इतके भिकारी आहेत की, आजपर्यंत पक्षाने जमवलेल्या वर्गणीतून आणि टक्केवारीतून घर चालवले, अशी बोचरी टीका त्यांनी केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाराष्ट्रात राजकारणाचं गुन्हेगारीकरण होतंय, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका

ज्येष्ठ नाट्य व चित्रपट अभिनेते श्रीकांत मोघे यांचं निधन