लोकशाही न्यूज नेटवर्क | राज्याच्या राजकारणातील ठाकरे-राणे वाद हा काय नवीन नाही. या कुटुंबीयांमध्ये नेहमी वाद होतचं असतात. मात्र आता व्हॅलेंटाईन विकमध्ये या दोन्ही कुटुंबीयांमध्ये प्रेमाचे वारे वाहताना दिसत आहे. त्यामुळे या राजकीय रिलेशनशिपचे खरे लव्हगुरू ते सात नगरसेवक ठरले आहेत. या रिलेशनशिपला भाजप आमदार नितेश राणे यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे.
वैभववाडी नगरपंचायतीतील रवींद्र रावराणे, संजय चव्हाण, दीपा दीपक गजोबार, संपदा शिवाजी राणे, रवींद्र तांबे, संतोष पवार आणि स्वप्निल इस्वलकर या सात नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून आज ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
या पक्षप्रवेशावर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देताना, शिवसेना हे आमचे जुने प्रेम आहे, आणि जुन्या प्रेमाला विसरायचे नसते, म्हणून हे 7 नगरसेवक व्हॅलेंटाईनडे च्या निमित्ताने मी उद्धव ठाकरे यांना पाठवत आहे, असे म्हणत त्यांनी ठाकरे कुटुंबीयांशी असलेल्या प्रेमाच्या संबंधांचा खुलासा केला.
वाभवे वैभववाडीची परिस्थिती जर पाहिलीत तर येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्याकडे मूळ उमेदवार म्हणून शिवसैनिक उमेदवार पण उभं राहू शकत नाही, त्यांना उमेदवार पण मिळणार नाहीत अशी परिस्थिती शिवसेनेची असल्याचे नितेश राणे यावेळी म्हणाले.
तसेच मेडिकल कॉलेज संबधित एक किस्साही त्यांनी सांगितला. मेडिकल कॉलेज रुटीन फाईलसाठी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मेडिकलची फाईल साईन केली. त्यामुळे आम्ही काही दिले तर ठाकरे घेणार नाही म्हणून हे सात नगरसेवक आभार मानण्यासाठी पाठवत असल्याचही त्यांनी यावेळी सांगितले.
राणेंची भाषाही बदलली
भाजप आमदार नितेश राणे यांनी अनेकवेळी उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे. मात्र मेडिकल कॉलेजच्या फाईलवर साईन केल्यानंतर नितेश राणे यांचा हा सूर बदलला असून त्याचे आभारही मानले आहे.
Comments
Loading…