in

‘गो कोरोना’ या घोषणेची राहील तुम्हाला साथ…कवी आठवलेंच्या गृहमंत्र्यांना शुभेच्छा!

लोकशाही न्यूज नेटवर्क

गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोना झाल्याची माहिती त्यांनी ट्विटर वरून दिली. यानंतर त्यांनी संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारन्टाइन होण्याचे आवाहन केले. तसेच स्वत: देखील क्वारन्टाइन होणार असल्याचे सांगितले. यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देशमुखांना चारोळीतून आराम करण्याचा ‘आठवले स्टाईल’ सल्ला दिला आहे. रामदास आठवले यांनी कविता ट्वीट केली आहे.

“गृहमंत्री अनिल देशमुखजी आपण लवकर करावी कोरोनावर मात
गो कोरोना या घोषणेची राहील तुम्हाला साथ
कोरोनाने माझा केला होता पिच्छा
तेव्हा तुम्ही दिल्या होत्या मलाही शुभेच्छा
कारण तुम्ही आहात माझेल चांगले मित्र
म्हणून मी आज रंगवितो शुभेच्छांचे शब्दचित्र!”
अशा शब्दात आठवले यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आठवले यांनी दिल्लीत चिनी नागरिकांसोबत ‘गो कोरोना’च्या घोषणा दिल्या होत्या. यावेळी ‘गो कोरोना गो’ हे वाक्य चांगलंच गाजलं होतं. त्यावर गाणीही झाली. तसेच सोशल मीडियावर आठवले यांना ट्रोल देखील करण्यात आले. मात्र त्यांचा कवी अंदाच अनेकांना आवडतो. यंदाही गृहमंत्र्यांना त्यांनी स्वत:च्या हटके अंदाजात शुभेच्छा दिल्याने हे ट्वीट चांगलेच चर्चेत आहे

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा गुजरातींभोवती रंगला रासगरबा!

क्रिकेटच्या थेट हवाई छायाचित्रणासाठी सशर्त ड्रोनला परवानगी