‘हम दो, हमारे दो’च्या घोषणेचा वापर पूर्वी कुटुंब नियोजनासाठी केला जात होता. जर राहुल गांधींना या घोषणेचा प्रचार करायचा असेल तर त्यांनी आधी लग्न करायला हवं आणि लग्न करायचं असेल तर त्यांनी दलित मुलीशी करावं आणि महात्मा गांधींचं जातीयवाद हटवण्याचं स्वप्न पूर्ण करावं. त्यांच्या या कृतीतून तरुणांना प्रेरणा मिळेल, असा सला आरपीय नेते रामदास आठवले यांनी दिला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत सरकारच्या ‘हम दो, हमारे दो’ धोरणावरून टीका केली होती. हे सरकार हम दो, हमारो दो असं आहे, अशा शब्दांत राहुल यांनी मोदी सरकारच्या भांडवली धोरणांवर टीका केली होती.
संसदेत ११ फेब्रुवारी रोजी भाषण करताना राहुल गांधी मोदी सरकारवर टीका केली होती. हम दो, हमारे दो म्हणजे सध्याचं केंद्र सरकार केवळ ४ लोक चालवत असल्याचा आरोप राहुल यांनी केला होता. मी त्यांची नावं घेणार नाही. मात्र. ते लोक कोण आहेत, हे सर्वांना माहिती आहे, अशी टीकाही राहुल यांनी केली होती
Comments
Loading…