in

माजी केंद्रीय मंत्री राम नाईक कोरोना पॉझिटिव्ह

सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत आहे. अशातच उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल व माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांना कोरोनाची लागण झाली आहे. नाईक यांनी स्वत:ला गोरंगाव पूर्व, गोकुळधाम येथील लक्षचंडी सोसायटीमधील त्यांच्या घरीच विलगीकरण केलं आहे.

राम नाईक यांना थोडा ताप आला होता. त्यानंतर त्यांनी लगेच कोरोना चाचणी केली. या चाचणीत त्यांना लागण झाल्याचं समोर आलं. दरम्यान, डॉक्टरांच्या देखरेखीखाली नाईक यांच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले असून त्यांची प्रकृती सुधारत आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक झपाट्यानं कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. दररोज ६० हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे, तर मृतांचा आकडाही झपाट्यानं वाढत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Delhi Lockdown | राजधानीत लॉकडाऊन, मुख्यमंत्री केजरीवाल यांची घोषणा

मानसिक संतुलन बिघडलेल्या तरुणाने केली ५ जणांची हत्या