in ,

Corona Virus Trailer: राम गोपाल वर्मा यांच्या ‘कोरोना व्हायरस’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Share

दिग्दर्शक, निर्माता राम गोपाल वर्मा यांचे सिनेमा त्यांच्या वेगळ्या शैली साठी प्रसिद्ध आहेत. कायम ते वेगळं काहीतरी करताना दिसतात आणि तेच त्यांनी यंदा सुद्धा करायचं ठरवलं आहे. मध्यंतरी कोरोना व्हायरस या विषयावर राम गोपाल वर्मा सिनेमा बनवत आहे अशी चर्चा रंगली होती. अखेर हे स्पष्ट झालं आहे की, ही फक्त चर्चा नसून या व्हायरस वर आधारित एक सिनेमा लवकरच भेटीला येणार आहे. ‘कोरोना व्हायरस’ असं या सिनेमाचं नाव असून सिनेमाचा ट्रेलर नुकताच भेटीला आला आहे.

तेलुगू भाषेत असलेल्या या सिनेमाचा तेलगू ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. राम गोपाल वर्मा आणि सीएम प्रोडक्शन्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून हा चित्रपचट एनटीआर फेम अगस्त्य मंजू यांनी दिग्दर्शित केला आहेत. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर वाटते की, हा चित्रपट थ्रिलर आहे. एका कुटुंबातील एक व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह असल्याची शंका येते. त्यानंतर निर्माण घरातील व्यक्तींमध्ये निर्माण होणारी भितीदायक परिस्थिती, या सगळ्या गोष्टींच्या अवती भोवती या चित्रपटाचा ट्रेलर रंगताना दिसतो आहे.  

राम गोपाल वर्मा यांच्या ‘आग’ आणि ‘सरकार’ या सिनेमांमध्ये झळकलेले बिग बी अमिताभ बच्चन यांनी खुद्द हा ट्रेलर त्यांच्या सोशल मीडिया वरून शेअर केला आहे. तो शेअर करत राम गोपाल वर्मा यांची प्रशंसा बिग बी करतायत. शिवाय राम गोपाल वर्मा यांनी सुद्धा बिग बी यांचे आभार मानले आहेत. हा सिनेमा कोरोना व्हायरस वर आधारित आहे तसंच हा सिनेमा लॉकडाऊन मध्ये शूट केला आहे हे वर्णन सुद्धा बिग बी यांनी त्यांच्या ट्वीट मध्ये करतात. लॉकडाऊन मुळे घरात बसलेल्या सर्वांनाच आता या सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. परंतु हा सिनेमा लॉकडाऊनमध्ये भेटीला येणार की लॉकडाऊन नंतर हे अद्याप जाहीर व्हायचं आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

XXX Star मिया मालकोवा चे ‘हे’ फोटोज तुम्ही एकट्यानेच पहा…

Forest Fire in Uttarakhand: उत्तराखंडच्या जंगलात आगीचा तांडव, PHOTO व्हायरल…