in

Raksha Bandhan 2020 ; अनेक वर्षानंतर येतोय ‘सर्वार्थ-सिद्धी’सह दीर्घायु आयुष्मान ‘योग’, जाणून घ्या शुभ मुहूर्त

Share

राखीपौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन हे दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला असतं. यंदा 2020 ला राखीपौर्णिमा ही येत्या 3 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या सणांपैकी रक्षाबंधन म्हणजेच राखीपौर्णिमा सण एक आहे. तर हा सण भाऊ-बहिणीचा आहे. त्यांच्यातील पवित्र नात्याला समर्पित हा सण आहे. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या मनगटावर प्रेमाचं आणि रक्षणाचं प्रतिक अशी राखी बांधते. भावाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी बहीण मागणं मागते आणि एकमेकांना गिफ्ट देऊन सणाचा आनंद द्विगुणीत होतो.

29 वर्षानंतर शुभ संयोग

भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचा सण रक्षाबंधन यावेळी अतिशय खास आहे, कारण यावर्षी रक्षाबंधनला सर्वार्थ सिद्धी आणि दीर्घायु आयुष्मानचा शुभयोग असल्याचे सांगितले जात आहे. ज्योतिषाचार्यांच्या नुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी असा शुभ संयोग 29 वर्षानंतर येत आहे. यासह या वर्षी भद्रा आणि ग्रहणाचे सावटही रक्षाबंधनावर नसणार आहे.

जाणून घ्या शुभयोग

यावर्षी रक्षाबंधनाला सर्वार्थ सिद्धी आणि दीर्घायु आयुष्मान योगसह सूर्य शनिचा समसप्तक योग, सोमवती पोर्णिमा, मकरचे चंद्र श्रवण नक्षत्र, उत्तराषाढ नक्षत्र आणि प्रीती योग बनत आहे. यापूर्वी हा योग 19991 मध्ये आला होता. हा संयोग कृषी क्षेत्रासाठी विशेष फलदायी मानला जातो.

राखीपौर्णिमेचे शुभ मुहूर्त

यंदा 2 ऑगस्टला सकाळी 9 .28 मिनीटांनी पौर्णिमा सुरू होणार आहे आणि 3 ऑगस्टला रात्री 9.28 मिनीटांनी पौर्णिमा समाप्त होईल. रक्षाबंधन म्हणजेच राखीपौर्णिमेच्या सणाचा शुभ मुहूर्त सकाळी 9.20 वाजल्यापासून तर रात्री 9.17 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे या काळात आपण कधीही आपल्या भावाला राखी बांधू शकता. पण त्यातल्या त्यात सर्वात चांगला मुहूर्त हा साधापण दुपारी 1.48मिनीटांपासून तर 4.29 मिनीटांपर्यंतचा आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Samsung Galaxy M31s च आज लाँचिंग; पाहा फीचर्स आणि किंमत

देशात 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक रुग्ण वाढ; पाहा आकडेवारी