in

“बिचाऱ्या मुलांवर दया करा” राखी सावंतचं वक्तव्य

क्रुझवर पार्टीमध्ये अमली पदार्थ पकडण्यात आले. त्या पार्टीला अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान गेल्या १९ दिवसांपासून तुरुंगात आहे. परंतु त्याचा तुरुंगवास संपायची चिन्ह अजूनही दिसत नाहीत. बुधवारी एनडीपीएसच्या विशेष न्यायालयानं आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला. पण आर्यननंतर आता अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेची चौकशी सुरू आहे. दरम्यान या सगळ्यात प्रकरणात राखी सावंतने एनसीबीला सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत विनंती केली आहे.

या दोघांच्या समर्थनास राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राखी सावंत सांगत आहे की, तुम्ही काय करत आहात? दिवाळीआधीच तुम्ही दिवाळी साजरी करता, दिवाळीआधीच मोठे दिवाळीचे फटाके फोडत आहात, मोठे बॉम्ब फोडता. तुम्ही NCBवाले काय करत आहात, दया करा दया, बिचाऱ्यामुलांवर दया करा. ते आता मेहनत करत आहेत, अरे त्यांच्यावर दया कर. NCB वाल्यांसाठी आणखी काम आहेत, जगात इतर लोक आहेत जे अशी काम करतात, त्यांना पकडा ना. असे राखी सावंतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सांगितल आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मंत्री छगन भुजबळ धावले अपघात ग्रस्तांच्या मदतीला

काँग्रेस संपवण्यासाठी सर्व एकत्र आले; बाळासाहेब थोरातांचा खळबळजनक आरोप