in

‘एमएसपी’वर कायदा बनल्यास शेतकऱ्यांना फायदा’ – राकेश टिकैत

लोकशाही न्यूज नेटवर्क | दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी (एमएसपी) किमान आधारभूत किंमत या कायद्यात अस्तिवात असल्याचे विधान केले आहे. या मोदींच्या विधानावर आता भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘एमएसपी’वर कायदा बनल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल असे टिकैत म्हणाले आहेत.

आम्ही कधी म्हटलं की (एमएसपी) किमान आधारभूत किंमत संपत आहे? आम्ही म्हटलं की (एमएसपी) किमान आधारभूत किंमतीवर कायदा तयार करावा. असा कायदा बनल्यास देशातील सर्व शेतकर्‍यांना त्याचा फायदा होईल.

सध्या एमएसपीवर कायदा नाही आणि शेतकर्‍यांनी व्यापऱ्यांची लूट केली असल्याचा आरोप राकेश टिकैट यांनी यावेळी केला. नवीन कृषी कायद्यात एमएसपी आहे एमएसपी राहणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत म्हणाले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मोदी सरकारसाठी शेतकरी, जवान नाही तर 3 ते 4 उद्दोगपती देव – राहुल गांधी

समोसा खात मिया खलिफाचा पुन्हा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा