in

आंतरराष्ट्रीय स्तरावरून आलेल्या पाठिंब्यांशी टिकैत यांना काहीही देणे-घेणे नाही!

लोकशाही न्यूज नेटवर्क

कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आंतरराष्ट्रीय स्तरावरून समर्थन मिळत आहे. तर, दुसरीकडे देशांतर्गत मुद्द्यांमध्ये बाहेरच्यांचा हस्तक्षेप नको, अशी भूमिका भारतातील मान्यवरांनी मांडली आहे. तर, आंतरराष्ट्रीय स्तरावरून मिळणाऱ्या पाठिंब्याशी काहीही देणे-घेणे नाही, असा सूर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी लावला आहे.

पॉपस्टार रिहानाने ट्विट करत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यासोबतच मिया खलिफा तसेच पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने सुद्धा यावर ट्विट करत, आम्ही सर्व भारतात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत, असे म्हटले आहे. याबद्दल टिकैत यांना विचारले असता ते म्हणाले, मला काय माहीत? त्यांनी दिला असेल पाठिंबा. मी कुठे त्यांना ओळखतो?

शनिवारी चक्काजाम आंदोलन
भारतीय किसान युनियनने दिल्ली तसेच दिल्लीच्या बाहेर शनिवारी (6 फेब्रुवारी) चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. तीन तास चालणाऱ्या या आंदोलनादरम्यान जे वाहतूक कोंडीत अडकतील, त्यांच्या जेवणाची तसेच पाण्याची व्यवस्था करण्यात येईल. त्याशिवाय, सरकार आमच्याबरोबर कसे वागत आहे, हे देखील त्यांच्यासमोर मांडू, असे भारतीय किसान युनियनच्या राकेश टिकैत यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Birthday Special: पाहा उर्मिला मातोंडकरचा हटके अंदाज

तरुणांनी एसटीच पळवून नेली ; प्रशासन हादरलं