दिल्लीतील आंदोलन देशभरात पोहोचवणार असल्याचा निर्धार अखिल भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केला आहे. रोहतकमध्ये झालेल्या सभेत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. राकेश टिकैत यांनी रोहतकमध्ये संबोधित करताना हरियाणा, पंजाब राजस्थान आणि उत्तर प्रदेशनंतर आता पश्चिम बंगालमध्य किसान महापंचायती घेण्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केले.
श्रीराम हे रंघुवंशी होते. आणि आम्ही त्यांचे वंशज आहोत असे टिकैत म्हणाले. त्यामुळे भाजपाचा आणि श्रीरामाशी कोणताही संबंध नाही, असे ते म्हणाले. भाजपच्या लोकांनी महात्मा गांधी आणि रामभक्त हनुमान यांनाही आंदोलनजीवी केलंय. त्यामुळे पंतप्रधानांनी माफी मागितली पाहिजे, असे टिकैत म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये किसान पंचायत
केंद्रीय कृषी कायद्याविरोधा सामान्य जनता देखील पिचली आहे. पश्चिम बंगालमधील जनता देखील दु:खी आहे. त्यामुळे बंगालमध्ये किसान पंचायतीचं आंदोलन हाती घेण्यात येणार आहे. यंदा पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर किसान सभा आक्रमक झाल्यास भाजपाला याचा फटका बसू शकतो.
Comments
Loading…