in

अलमट्टी धरणांची उंची वाढविण्याचा निर्णय रद्द करा; राजू शेट्टींनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी


सतेज औंधकर, कोल्हापूर |
कोल्हापूर ,सांगली व बेळगांव जिल्ह्याच्या महापुरास कारणीभूत असणा-या अलमट्टी धरणांची उंची वाढविण्याचा निर्णय रद्द करून कृष्णा , दुधगंगा , वेदगंगा व हिरण्यकेशी नद्यावरील पुलाचा भराव कमी करून कमानी बांधकाम करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेटटी यांनी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेटटी यांनी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची घेतली भेट घेतली. यावेळी कर्नाटक राज्य व केंद्र सरकारचे समन्वयक मंत्री शंकरगौंडा , खासदार आण्णासाहेब ज्वोले, मा. आमदार संजय पाटील , मा. आमदार कल्लाप्पाणा मग्यान्नावर , सावकर मादनाईक , राजेंद्र गड्यान्नावर व बेळगांव जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

सीमाभागामध्ये महापुराने थैमान घातले असून महापुराचे पाणीपातळी कमी होण्यास वेळ लागल्याने नागरी वस्तीत व शिवारात जास्त दिवस पाणी राहिल्याने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. २००५ , २००६, २०१९ व २०२१ या महापुराचा विचार करता २०२१ च्या महापुरात कोल्हापूर , सांगली व बेळगांव जिल्ह्यातील महापुराची परिस्थिती बदलले असल्याचे जाणवून आले आहे.

कृष्णा , दुधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी या नदयावर जे पूल बांधलेले आहेत. त्या अनेक पूलाच्या दोन्ही बाजूस दोन -दोन किलोमीटर भराव आहे. महापूर काळामध्ये नदया पाञापासून दोन – दोन किलोमीटर पाणी पसरते अशा काळात हे पूल बंधा-याचे काम करतात म्हणून नदीतील पाण्याची पातळी अत्यंत मंद गतीने कमी होते.महापुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑगस्टपर्यंत अलमट्टीची पाणीपातळी ५१२ मीटर ठेवावी. बेळगांव जिल्ह्यातील महापुरास कारणीभूत ठरत असलेल्या कृष्णा , दुधगंगा , वेदगंगा व हिरण्यकेशी नद्यावरील पुलांचा भराव कमी करून दोन्ही बाजूस दोन -दोन कमानी बांधकाम केल्यास पाण्याचा फुगवटा कमी होऊन पात्राबाहेर पडलेले पाणी सहजगत्या प्रवाहीत होईल.सध्या कृष्णा नदीवर महाराष्ट्र हद्दीपासून ते हिप्परगी धरणापर्यंत मोठे ६ पूल , हिरण्यकेशी नदीवर महामार्गावरील ५ पूल व दुधगंगा -वेदगंगा नदीवरील पूलांचे भराव महापुरास कारणीभूत ठरत असून चिकोडी तालुक्यांतील अंकली -मांजरी पुलाच्या भरावामुळे शिरोळ , हातकंणगले , चिकोडी व निपाणी तालुक्यांतील पुरस्थिती गंभीर होत आहे. यामुळे कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणांची उंची न वाढविता कृष्णा , दुधगंगा , वेदगंगा व हिरण्यकेशी नद्यावरील पुलाचा भराव कमी करून कमानी बांधकाम करण्याची मागणी केली.

यावेळी मुख्यमंत्री बोम्मई यांनी महापुराच्या समस्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून पुलांचे भराव कमी करून कमानी उभारणी करून पाणी प्रवाहित केले जाईल. तसेच महापुर नियंत्रणासाठी अभ्यासगट नेमून त्याबाबत उपाययोजना करत असून कर्नाटक सरकारकडून केंद्रीय जल आयोगाकडेही याबाबत पत्रव्यवहार केले असल्याची माहिती दिली. सदर अहवाल आलेनंतर पुढील उपाययोजनासाठी लवकरच मंत्रालयात बैठकीसाठी शेतकरी प्रतिनिधी म्हणून राजू शेटटी यांना या बैठकीसाठी निमंत्रीत केले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

CSK vs KKR Live : कोलकात्याला तिसरा झटका, कर्णधार मॉर्गन 8 धावांवर बाद

अनंत गिते पाठोपाठ आता शिवतारेंची खदखद, महाविकास आघाडीत सगळं चांगलं, पण…