राज्यातील विविध भागात कोरोनाचा उद्रेक होत आहे. राज्यात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना संवाद साधला.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
- राज्यात कोरोना रुग्णांचा उद्रेक
- जम्बो रुग्णालयांच्यासंख्येत वाढ करण्यात आली आहे.
- राज्यात २ लाख १० हजार कोरोना बाधित रुग्ण
- राज्यात कोरोना चाचण्यांमध्ये वाढ
- राज्यातील लसीकरण केंद्रात वाढ करण्यात आली आहे.
- दिवसाला ३ लाख लोकांचे लसीकरण
- मुंबई, पुणे, नागपूरची चिंता वाढली.
- पुढच्या ३ महिन्यात लसीकरण पूर्ण करण्याचा उद्देश
- कोरोन नियमांचे सक्तीने पालन करणे बंधनकारक
- सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना जारी
- मोठ्या प्रमाणात चाचण्या झाल्या पाहिजेत
- सर्वाधिक कोरोना चाचण्या महाराष्ट्रात झाल्या
- कोरोना चाचण्यामध्ये महाराष्ट्र अव्वल
- १८ वर्षावरील व्यक्तींना लसीकरण करण्यासाठी केंद्राकडे मागणी
- ४५ वर्षाखालील व्यक्तीचे लसीकरण झाले पाहिजे
- ४५ वर्षावरील व्यक्तीचे लसीकरण सुरू
- हाफकिन मध्ये लसीकरणास केंद्राने मान्यता द्यावी
- २ दिवसात लॉकडाऊन चा निर्णय घेणार
- रुग्णसंख्येत घट न झाल्यास काही शहरात लॉकडाऊन चा निर्णय घेणार
- मुख्यमंत्र्यांसोबत चर्चाकरून निर्णय घेणार
- निवडणूक सुरू तिथे नियमांचे पालन नाही
- गुजरातमध्ये क्रिकेट सामन्यांसाठी गर्दी झाली
- सर्वांनी नियमांचे पालन करावे
- संस्थात्मक विलगीकरणावर जोर देतोय
- लोकसंख्या जास्त असल्याने रुग्ण संख्या जास्त
Comments
Loading…