in

‘केंद्र सरकारनंच सेलिब्रेटी लोकांना टि्वट करायला सांगितलं’

लोकशाही न्यूज नेटवर्क

केंद्र सरकारनं देशातील सेलिब्रेटी लोकांना टि्वट करायला सांगितले होते. भारतरत्न प्राप्त सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर अशा लोकांना टि्वट करायला लावणं चुकीचं आहे, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. विदेशातील लोक भारतातील अंतर्गत मुद्यावर बोलू शकत नाहीत. यामुळे आपल्या देशाची एकता बाधित होणार नाही, अशा आशयाचे टि्वट सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अभिनेता अक्षय कुमार, अजय देवगण, विराट कोहली, अजिंक्य राहाणे यांसह अनेकांनी केले होते. याचा खरपूस समाचार राज ठाकरेंनी आपल्या पत्रकार परिषदेत घेतला.

अमेरिकन पॉपस्टार रियाना हिनं शेतकरी आंदोलनावर टि्वट केलं होतं. यानंतर देशभरातील क्रिकेटपटू आणि सिनेक्षेत्रातील अनेक मान्यवरांनी सरकारच्या समर्थनार्थ टि्वट केले होते. आता या सर्वांनी केंद्र सरकारच्या सांगण्यावरून टि्वट केले असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

कृषी कायदे चुकीचे नाहीत, त्रुटी असू शकतात –

राज यांनी आपल्या पत्रकार परिषदेत अनेक मुद्यांवर मत व्यक्त केले. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरही राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कृषी कायदे संपूर्णपणे चुकीचे नाहीत. मात्र, त्यात त्रुटी असू शकतात, असं मत राज यांनी व्यक्त केलं आहे. कायदा चुकीचा नाही तर त्यात त्रुटी असू शकतात. हा विषय इतका चिघळायला नको होता. चीन-पाकिस्तानच्या सीमेवर नाही इतका तणाव शेतकऱ्यांच्या आंदोलनात पाहायला मिळत आहे, हे दुर्दैवी आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“अदानी शरद पवारांच्या घरी येऊन गेले, अन्…वीजबिल माफीचा निर्णय बदलला”

वसईच्या क्राइम ब्राँच युनिट दोनच्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला