in ,

Raj Thackeray | “माझ्या भेटिला येऊ नका…”वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र

राज्यात कोरोना रूग्ण संख्या जरी कमी होत असली तरी कोरोनाचं संकट टळलेल नाही. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १४ जून रोजी असणाऱ्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेटीसाठी न येण्याचे आवाहन एक पत्रक काढून पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना केले आहे.

दरवर्षी माझ्या वाढदिवसाला आपण भेटतो. तुम्ही फार प्रेमाने अनेक ठिकाणाहून येता. मलाही तुम्हाला भेटल्यावर आनंद होतो आणि अंगात नवा उत्साह संचारतो, उर्जा मिळते. तशी उर्जा जाहीर सभेतही मिळते. पण तिथे तुम्ही नुसते दिसता, भेटत नाही. म्हणून माझ्या दृष्टीने वाढदिवसाचा दिवस तुमच्या सहवासात, तुम्हाला भेटल्याने खरा साजरा होतो. तुमच्या भेटीची मी वाट पाहात असतो. मात्र हेही वर्ष बिकट आहे. मागच्या वर्षीसारखंच. अजूनही कोरोनाने महाराष्ट्राला घातलेला विळखा सोडलेला नाही.

लॉकडाऊन उठतो आहे. हळूहळू सगळं पूर्वपदावर यायला लागलं आहे. परंतु परिस्थिती अजूनही गंभीरच आहे. आजचंच पाहा, महाराष्ट्रात एका दिवसात काल १२,२०७ नवे रुग्ण सापडले आणि १,६४,७४३ जण आत्ताही उपचार घेत आहेत. अशा वातावरणात वाढदिवस वगैरे साजरा करणे मनाला पटत नाही. माझे सहकारी म्हणून तुम्ही हे नक्की समजून घ्याल. असे राज ठाकरे म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

परवाना संपलेल्या मेडिकलवर कारवाई; लाखोंचा औषध साठा जप्त

शेतकऱ्यांना पीकविमाचा लाभ मिळवून देण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल