in

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जामीन मंजूर

लोकशाही न्यूज नेटवर्क

राज ठाकरे यांना जामीन मंजूर झाला आहे. वाशी न्यायालयात यासंदर्भात सुनावणी पार पडली. राज ठाकरे यांच्यासोबत  नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकरही न्यायालयात उपस्थित होते. वाशी टोल नाक्यावर मनसे कार्यकर्ते मोठ्या आतुरतेने राज ठाकरेंची एक झलक पाहण्यासाठी वाट पाहत होते.

राज ठाकरेंच्या भाषणानंतर टोलनाक्याची तोडफोड – 

26 जानेवारी 2014 रोजी वाशीमध्ये राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. राज ठाकरे यांच्या या भाषणानंतर मनसैनिकांनी वाशी टोलनाक्याची तोडफोड केली होती. या प्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर वाशी न्यायालयात सुनावणी पार पडली.

 

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताचं कौतुक; ‘हे’ आहे कारण

‘UN HUMAN RIGHTS’ची शेतकरी आंदोलनात उडी; टि्वट करून दिला सल्ला