in ,

राज ठाकरेंनी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या

‘देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. सर्वाधिक रुग्ण आणि सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रातच झाले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असताना टाळेबंदीसारखे पर्याय अवलंबले जात आहेत. ते आता राज्याला परवडणारं नाही. मात्र राज्याला लसींचा पुरवठा होत नसल्याने पर्याय तरी काय उरतो?’ असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत राज्यातील स्थितीचा आढावा मांडला आणि काही महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत.

  1. महाराष्ट्र राज्याला स्वतंत्रपणे लसी खरेदी करण्याची परवानगी द्यावी
  2. सिरमला महाराष्ट्रात स्वतंत्रपणे लस विकण्याची परवानगी द्यावी
  3. राज्यातील इतर खासगी संस्थांना लस खरेदी करण्याची परवानगी द्यावी
  4. लसीचा पुरवठा वेळेत व्हावा यासाठी हॉपकिन्स आणि हिंदुस्थान अँटिबायोटिकला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी
  5. राज्याला प्राणवायू आणि रेमडेसिवीर यांचा आवश्यक पुरवठा करता यावा म्हणून मोकळीक द्यावी अशीही विनंती.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या मनसेनं सुरुवातीच्या काळात लॉकडाऊनच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र राज्यात कोरोनाची स्थिती आणखीनच गंभीर झाली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना विनंती केल्यानंतर हा विरोध काहीसा मावळला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Lockdown | आता 25 जणांच्या उपस्थितीतच उरकावं लागणार ‘शुभमंगल’

आशुतोष राणा कोरोना पॉझिटीव्ह, काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस