in

मनसेच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 15 वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून मनसे कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मनसेने वर्धापन दिन सोहळा रद्द केला आहे. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून मनसे कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये एक फोटो शेअर केला आहे . त्यामध्ये किल्ल्याला तोरण माळा, उगवता सूर्य आणि भरारी घेणारा पक्षी या सांकेतिक चिन्हां आहेत. मनसेने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा नवा उत्साह आणि काम करण्याची उर्मी भरण्यासाठी संदेश दिल्याचे म्हटले जात आहे. या पोस्ट सोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील माझ्या सर्व सहकाऱ्यांना वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा. #मनसेवर्धापनदिन #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रप्रथम #राजठाकरे #महाराष्ट्रसैनिक असे कॅप्शन देखील देण्यात आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राठोड अन् वाझे : शिवसेना लागोपाठ दोनदा अडचणीत

संजय लीला भन्साळींना कोरोनाची लागण