in ,

न्यायालय म्हणतंय, राज ठाकरे हाजिर हो… मनसैनिक ग्रॅण्ड वेलकमच्या तयारीत!

लोकशाही न्यूज नेटवर्क

वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाने वॉरंट जारी केले होते. त्यामुळे राज ठाकरे उद्या न्यायालयात हजर राहणार आहेत. दरम्यान राज ठाकरे येणार म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी त्यांचं ग्रँड वेलकम करण्याचे ठरवलंय आहे.

26 जानेवारी 2014 रोजी वाशीमध्ये राज ठाकरे यांनी भडकावू भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. राज ठाकरे यांच्या या भाषणानंतर मनसेसैनिकांनी वाशी टोलनाक्याची तोडफोड केली होती. या प्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची बेलापूर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र, या प्रकरणी अनेक वेळा न्यायालयात हजर राहण्यास सांगूनही राज ठाकरे हजर झाले नव्हते. त्यामुळे आता बेलापूर न्यायालयाने राज ठाकरे यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे. तसंच, राज ठाकरे त्यामुळे उद्या सकाळी 11 वाजता राज ठाकरे नवी मुंबईत दाखल होणार आहेत. तर राज ठाकरे येणार म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी त्यांचं ग्रँड वेलकम करण्याचे ठरवलंय. नवी मुंबई पालिका निवडणूकीच्या तोंडावर राज ठाकरे येत असल्याने याचा राजकीय फायदा नक्कीच मनसेला होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सॅनिटायझर पाजल्याप्रकरणी दोन वैद्यकीय अधिकारी निलंबित

शरद पवारांची ही योजना की इच्छा ? दिल्ली हिंसाचारावरून भातखळकरांचा सवाल