in

Raj Thackeray | अतुल भातखळकरांनी मनसेचं तिकीट मागितलं होतं – राज ठाकरे

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून तिकीट मागितलं होतं, असा गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. एका वृत्तपत्रानं आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी माझ्याकडे बघून ते पक्षात आले आणि स्थानिक कारणांमुळे पक्ष सोडून गेले. आता पक्षांतराच्या गोष्टी होत असतात. नुकतंच पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचे नेते भाजपमध्ये गेले. त्यांचं काय झालं?”, असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

“राज्याच्या २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी तर भाजपचे अतुल भातखळकर माझ्याकडे आले होते. त्यांनी मनसेचं तिकीट मागितलं होतं. मी नितीन गडकरींना फोन करुन त्यांची समजूत काढली होती की असं करू नका. ज्या पक्षात आहात त्यातच काम करत राहिलं पाहिजे”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

BMC global tender | महापालिकेचे ग्लोबल टेंडर गुंडाळणार?

ICMR | डिसेंबरपर्यंत संपूर्ण देशाचे लसीकरण होणार