बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचा जोर वाढणार आहे. आठवडाभर पश्चिम महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने हा अंदाज वर्तविला आहे. राज्यातील अनेक धरणांच्या भागांमध्ये अद्याप अपेक्षित पाऊस पडलेला नाही. मात्र या आठवड्यात पाऊस ही कसर भरुन काढण्याची शक्यता आहे.
Comments
0 comments