in

राज्यात येत्या ४,५ दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

गणपतीचं आगमन होताच मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात येत्या २४ तासात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची व त्याची पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेनं सरकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पावसानं काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर आता पुन्हा दक्षिणेसह संपूर्ण राज्यात पुढील 4-5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.उत्तर मध्य महाराष्ट्रात कोकणात मुसळधार पाऊस पडणार आहे. सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे येत्या काही तासांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

दरम्यान, मुसळधार पावसानं सगळीकडे चिंतेचं वातावरण निर्माण केलं आहे. अनेक ठिकाणी नागरिकांचं नुकसान झालेलं पहायला मिळत आहे. अनेक परिसरातील नद्यांच्या पुलावरून पाणी ओसंडून वाहत होते. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

What do you think?

-3 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; ‘या’ चाकरमान्यांना मिळणार स्थानकात प्रवेश

Mira Road