in

Rain Update;मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार सुरूच

Share

मुंबईसह पालघरमध्ये पावसाची दमदार बॅटिंग सुरूच आहे. काल बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसाने ब्रेक घेतल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र आज पहाटे पुन्हा पावसाने दमदार सुरुवात केली आहे. यामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.तसेच येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडण्याचं प्रशासनाने आवाहन केले आहे.

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरुच आहे.त्यामुळे सखल भागात पाणी साठायला सुरुवात झाली आहे. तसेच मुंबईच्या पेडर रोड परिसरात भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पेडर रोड फ्लायओव्हर बंद आहे. उपनगरात वसई-विरार परिसरातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सकाळपासून येथली विविध सखल भागात पाणी साठायला सुरुवात झाली आहे.

पालघरमध्येही आज पावसाचा जोर कायम आहे. सफाळे, केळवे, माहिम, पालघर, बोईसर, तारापूर, चिंचणी, वाणगाव, डहाणू, तलासरी, कासा, मनोर या भागात पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. या पुरामध्ये अडकलेल्या काही लोकांना वाचवण्यात यशही मिळालं. पालघरमध्ये एनडीआरएफची टीम दाखल होऊन त्यांनी काही लोकांना रेस्क्यू ही केलं. पालघर जिल्ह्यात काल 264 मिमी पावसाची नोंद झाली तर महाराष्ट्रात सर्वाधिक डहाणू तालुक्यात 465 मिमी पाऊस झाला. आताही पाऊस सुरुच आहे.

कोकणातही मुसळधार

पावसामुळे रत्नागिरीतील चिपळूण आणि खेडमधील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील खेडची जगबुडी नदी आणि चिपळूणची वाशिष्टी नदी या दोन प्रमुख नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. नद्या सध्या धोका पातळीच्या वर वाहत असल्याने स्थानिक प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर चिपळूण नजिकच्या वाशिष्टीचा ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

मुंबईकरांसाठी Good News । विहार तलाव झाला ओव्हर फ्लो

Covid19 रुग्णालयात लागली भीषण आग