in

Mumbai Rain : पहिल्याच पावसात मुंबई मनपाचा दावा फोल; जनजीवन विस्कळीत

मुंबईत पावसाने रात्रीपासून हजेरी लावली आहे. शहरात अनेक ठिकाणी पाऊस पडत असल्याने सखल विभागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सायन, हिंदमाता, किंग सर्कल येथे पाणी साचले आहे. यामुळे पालिकेने केलेला नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे.

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचल्याने मुंबईची तुंबई होते. यावर्षी मोठ्या नाल्यांची 104 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा मुंबई महापालिका प्रशासन आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी के ला होता. हा दावा करून काही तासच झाले असताना हा दावा फोल असल्याचे उघड झाले आहे.

मुंबईत रात्रीपासून पडत आहे. गेल्या 24 तासात 8 जून ते 9 जून सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तासात मुंबईत शहर विभागात 48.49 मिलीमीटर, पूर्व उपनगरात 66.99 मिलीमीटर तर पश्चिम उपनगरात 48.78 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.अद्यापही पाऊस पडत आहे. यामुळे मुंबईच्या सायन, हिंदमाता, किंग सर्कल येथे पाणी साचले आहे. समुद्राला सकाळी 11.43 वाजता 4.16 मीटरची भरती असल्याने यावेळेत मोठा पाऊस पडल्यास शहरातील सखल भागात पाणी साचून राहणार आहे. याचा फटका रस्ते, रेल्वे वाहतुकीला बसू शकतो तसेच नागरिकांनाही त्याचा त्रास होणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

गोंदिया जिल्ह्यात 96 गावांना पुराचा धोका

बनावट कागदपत्रांनी सुरू केलेल्या रूग्णालयावर गुन्हा दाखल