लांब पल्ल्यांच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आज (6 मार्च) रात्री पावणेबारा वाजल्यापासून तिकीट आरक्षण प्रणाली बंद राहणार आहे. देखभाल आणि दुरुस्तीसाठी ही प्रणाली बंद ठेवण्यात येणार असल्याने या कालावधीत प्रवाशांना रेल्वेतिकिट मिळणार नाही, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. रविवारी सकाळी 6 वाजल्यानंतर ही प्रणाली सुरू होणार आहे.
मुंबई प्रवासी आरक्षण प्रणालीमध्ये (पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम -पीआरएस) विद्युत देखभाल तसेच सर्व्हरला अतिरिक्त वीज पुरवण्याच्या कामासाठी ही प्रणाली बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पीआरएस (आरक्षण) कोचिंग परतावा, चालू तिकीट बुकिंग, आरक्षण चार्टची तयारी, एनटीईएस, आयव्हीआरएस, परतावा, चार्ट प्रदर्शन, टचस्क्रीन, एनटीईएस डिस्प्ले आणि इतर सेवा आज रात्री रात्री 11.45 वाजल्यापासून उद्या (7 मार्च) सकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध होणार नाहीत. या कालावधीत मुंबई पीआरएस गाड्यांसाठी इंटरनेट बुकिंग उपलब्ध होणार नाही. परंतु, सध्याच्या परतावा नियमानुसार तिकीट परतावा देण्यात येईल.
Comments
Loading…