in ,

अपघातग्रस्त आदिवासी महिलेसाठी पोलीस बनले ”श्रावणबाळ”!

प्रशांत गोमाणे | कोरोना वैश्विक महामारीत डॉक्टरांसह, पोलिसांनीही महत्वपूर्ण भूमिका बजावली.कधी पोलीस संसर्ग रोखण्यासाठी रस्त्यावर उभे ठाकत पंढरीचा विठूराया बनले, तर कधी देवदूत बनून त्याने रेल्वे स्थानकावर आपली जीवाची बाजी लावत प्रवाशांचे प्राणही वाचवले. अशी अनेकोअनेक भूमिका बजावत असताना आता हेच पोलीस एका अपघातग्रस्त महिलेसाठी ”श्रावणबाळ” बनून पुढे आले आहेत. नेमकी पोलीस श्रावणबाळ बनण्या मागची ही घटना काय आहे ती संपूर्ण जाणून घेऊयात…

13 किलो मीटर गाडी चालवून, घाटातलं तब्बल 4 किमी अंतर चढून त्यांनतर जवळ-जवळ अर्धा तास रेल्वे रूळ चालून चार पोलिसांनी रेल्वे अपघातात जखमी झालेल्या 44 वर्षीय आशाताई वाघमारेला कुठलीही स्ट्रेचर नसताना बांबूला चादर बांधून झोळी तयार करत तितकाच खडतर प्रवास करत महिलेचा सुखरूप बचाव केला आहे.

सदर घटना ही 31 मे रोजीची आहे. कर्जत रेल्वे स्टेशन येथे कर्तव्यावर असताना पोलीस शिपाई निकेश तुरडे यांना खंडाळा घाटामध्ये पोल नंबर 106/12 येथे एक महिला जखमी अवस्थेत पडल्याची माहिती कंट्रोल रूमकडून मिळाली होती. या घटनेची माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न लावता सरकाळे,गांगुर्डे, गायकवाड, तूरडे, बनसोडे, भोपी हे पोलीस तातडीने निघाले. घटनास्थळी सहजासहजी पोहोचणे शक्य नव्हते.

सर्वप्रथम 13 कि.मी. अंतर त्यांनी चारचाकी गाडीने पूर्ण करत केलवली डोंगराच्या पायथा गाठला. त्यानंतर एक तास त्यांनी घाटाचा कडा चढून पार केला. मात्र अद्याप रेल्वे रूळ फार लांब होते. तब्बल रेल्वे रुळावर अर्धातासाची पायपीट करून ते कसेबसे घटनास्थळी पोहोचले. पोल नंबर 106/12 नजीक अपघातग्रस्त आशाताई जखमी अवस्थेत पडल्या होत्या. महिलेला घेऊन जाण्यासाठी स्ट्रेचर सुद्धा नव्हती. यावेळी पोलिसांनी लाकडाला चादर बांधून त्याची झोळी तयार केली. आणि त्या महिलेला त्या झोळीतून बसवून खांद्यावर नेत श्रावणबाळासारखे रुग्णालयाचा प्रवास सुरू केला. परतीच्या प्रवासात सुद्धा तोच खडतर प्रवास करावा लागणार होता. या दरम्यान तुफान पाऊस ही सुरू होता, मात्र त्याची परवा न करता त्यांनी महिलेला अॅम्ब्यूलन्स पर्यत पोह्चवले. त्यांनतर तिला अॅम्ब्यूलन्समधून कर्जत उपजिल्हा रुग्णालयत उपचारासाठी दाखल केले. दरम्यान या घटनेची माहिती प्रसिद्धी माध्यमांत झळकताचा या सर्व पोलिसांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

अपघातग्रस्त महिलेपर्यत पोहोचण्याचा प्रवास व तिथून तिला रुग्णालयात दाखल करण्यापर्यत प्रवास खूपच खडतर होता. या दरम्यान मनात एकच विचार होता, लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये कस पोचता येईल, आणि महिलेचे प्राण वाचवता येईल, असे पोलीस शिपाई निकेश तुरडे यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पाहा खणाच्या ड्रेसमध्ये सायलीची मनमोहक अदा

पाहा श्रेया घोषालनं काय ठेवले मुलाचे नाव …