in ,

मी बंगालमधील माझ्या सर्व रॅली रद्द केल्या, तुम्ही कधी करणार?

‘कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मी पश्चिम बंगालमधील आगामी माझ्या सर्व जाहीर रॅली रद्द करत आहे, अशी माहिती काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टि्वट करून दिली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभांवरून राजकीय पक्षांवर सध्या टीका होत आहे.

राहुल गांधी यांनी जाहीर सभा रद्द करत असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच मी इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांना आवाहन करतो की, त्यांनी कोरोनाच्या संकट काळात यावर सखोल विचार करावा, असंही राहुल यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

भारतात कोरोनाची स्थिती बिघडत चालली आहे. अशात सरकारनं सर्वसामान्य माणसांना नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे, तर दुसरीकडे विविध राजकीय पक्षांच्या मोठ्या सभा होत आहेत. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसामसह पुद्दुचेरी इथं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सर्वच राजकीय पक्षांच्या मोठ्या सभा, रॅली झाल्या. त्यामुळे सर्वसामान्य लोकांनाच नियम असतात का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

JEE MAIN | जेईई मेन परीक्षेला स्थगित

रुग्णांना वाऱ्यावर सोडलं जात नाही