लोकशाही न्यूज नेटवर्क
दिल्लीत कृषी कायद्याविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्य़ा 60 शेतकऱ्य़ांचा मृत्यू झाला.
यावरुन अन्नदाता गेल्याची नाही तर ट्रॅक्टर रॅलीची यांना लाज वाटतेय, असा टोला लगावत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यासोबतच कृषीविरोधी कायद्यांचे लेखी समर्थन करणाऱ्य़ांकडून न्यायाची अपेक्षा कशीकाय केली जाऊ शकते? हा संघर्ष शेतकरी-कामगार विरोधी कायदे संपेपर्यंत सुरूच राहील, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
Comments
0 comments