in

Rafale India Live Updates : संपुर्ण अंबालामध्ये कलम 144 केलं लागू

Share

अंबाला एअरफोर्स स्टेशनच्या आसपासच्या चार खेड्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आला असून तिथल्या नागरीकांना घराच्या छतावर चढण्यास मनाई करण्यात आली आहे. अंबाला एअरबेसवर राफेल लढाऊ विमानांचे आगमन झाल्याने हा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. एअरबेसच्या सभोवतालच्या चार गावात ही बंदी लागू असणार आहे.

आज दुपारी पाच राफेल आणि दोन सुखोई लढाऊ विमान अंबाला एअरबेसवर दाखल झालेत. त्यासाठी तिथल्या आजूबाजू परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वायुसेना स्टेशन परिसर आणि त्याच्या आसपासच्या चार गावांमध्ये कलम 144 अन्वये कायदा लागू करण्यात आला आहे. सकाळपासूनच हवाई दल स्थानकाकडे जाणारे रस्ते अडविण्यात आले आहेत. एअरफोर्स स्थानकाभोवती सुरक्षा कडक करण्यात आली आहे.

या ठिकाणी सैन्य व पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव, एअरफोर्स स्टेशनच्या आजूबाजूला घरांच्या छतावर चढण्यास लोकांना बंदी घातली आहे. बलदेव नगर, गरनाळा, बरनाला, धुळकोट, पंजाजखारा या गावात कलम 144 लागू करण्यात आले आहेत. अंबाला स्थानकाभोवती छायाचित्रण करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

SSC Results Declared 2020; यंदाही दहावीच्या निकालात मुलींचीच बाजी

What clothes will Lord Ramallah wear on the 5th, orange or green?

भगवान रामलल्लाचे कपडे भगवे की हिरवे, 5 तारखेला कोणते कपडे परिधान करणार?