भारत आणि फ्रान्स यांच्यात झालेल्या राफेल लढाऊ विमान खरेदीतील राफेलची निर्मिती करणाऱ्या डसॉल्टने या करारासाठी एका भारतीय मध्यस्थाला एक दशलक्ष युरो एवढी मोठी रक्कम ‘भेट’ दिली.
भारत आणि फ्रान्समध्ये राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीबाबत वर्ष २०१६ मध्ये करार झाला. त्यानंतर डसॉल्टने भारतातील मध्यस्थाला ही रक्कम दिली. वर्ष २०१७ मध्ये डसॉल्ट ग्रुपच्या बँक खात्यातून ‘गिफ्ट टू क्लाएंट’ म्हणून रक्कम ट्रान्सफर करण्यात आली.
फ्रान्समधील भ्रष्टाचारविरोधी तपास संस्था AFA ने डसॉल्टच्या बँक खात्यांचे ऑडिट केल्यानंतर ही बाब समोर आली. त्यानंतर कंपनीने ही रक्कम राफेल लढाऊ विमानांचे ५० मोठे ‘मॉडेल’ विकसित करण्यासाठी खर्च करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात अशी कोणत्याही विमानांची निर्मिती करण्यात आली नव्हती, अशी माहीती मिळत आहे. तपास संस्थांनी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे कोणतीही उत्तरे नव्हती. डसॉल्टने ही मोठी रक्कम कोणाच्या खात्यावर, कोणाला दिली आणि का दिली याबाबत कोणतेही उत्तर दिले नाही. या अहवालात नमूद करण्यात आलेल्या भारतीय कंपनीचे नाव याआधीदेखील वादात होते.
Comments
Loading…